Janvrutt.in
माझी लाडकी बहीण योजना

मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेच्या पैशांवरून महिलांमध्ये संतापाची लाट

मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेच्या पैशांवरून महिलांमध्ये संतापाची लाट

राज्य सरकारने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली. या लाडकी बहीण योजनेचा महायुतीला प्रचंड फायदा झाला. मात्र, ईकेवायसीमुळे अनेक महिलांना पैसे येणे बंद झाले. आता महिलांनी मोठा गोंधळ घातलाय.

राज्य सरकारने राज्यात महिलांसाठी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली. या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिलांना दरमहिन्याला सरकारकडून 1500 रूपये मानधन दिले जाते. मात्र, या योजनेचा लाभ घेण्याकरिता काही नियम आणि अटीही सरकारकडून ठरून देण्यात आल्या.

ज्याीवेळी ही योजना आली, त्यावेळी सरकारने महिलांनी केलेल्या अर्जांनुसार, सरसकट अर्ज मंजूर करून लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले. मात्र, अनेक महिलांनी अर्ज करताना नियम आणि अटी बाजूला सारून अर्ज केले. आता महिला व बालकल्याण विभागाकडून अर्जाची छाननी बारीकपणे केली जात आहेत. यासोबतच ईकेवायसीचीही अट ठेवण्यात आली. यादरम्यान केवाएसी करूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे येत नसल्याची ओरड अनेक महिलांची आहे.

महिला बालकल्याण विभागात महिलांचा मोठा गोंधळ 
ई-केवायसी करूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नसल्याने जळगावात महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात महिलांनी गोंधळ घातल्याचे बघायला मिळाले. गोंधळ वाढल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी महिलांना कार्यालयाबाहेर काढले आणि मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून घेतल्याचा प्रकार. महिला पैसे न मिळाल्याने गोंधळ घातल होत्या.

लाडकी बहीण योजनेचे पैसे येणे बंद झाल्याने महिला संतापल्या 

लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाल्याने जिल्हाभरातील वेगवेगळ्या तालुक्यांमधील महिलांनी महिला व बालकल्याण विभागाचे कार्यालय गाठत गोंधळ घातला. कार्यालयात विचारणा करण्यासाठी गेलेल्या महिलांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी अरेरावी केल्याचा आरोप महिलांनी केला आहे.

कर्मचाऱ्यांनी गोंधळ घालणाऱ्या महिलांना काढले कार्यालयाबाहेर 

दोन तास चाललेल्या या प्रकारानंतर संतप्त महिलांनी स्वतः व्हिडिओ बनवून घेत आपली व्यथा मांडून लक्ष वेधून घेतले.  महिलांचे व्हिडिओ सोशल मिडिव्यावर व्हायरल झाले आहेत. मात्र, महिलांचा गोंधळ अधिक वाढल्याचे लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी महिलांना कार्यालयाच्या बाहेर काढून थेट कुलूप लावले. यानंतर महिला या अधिकच संतापल्याचे बघायला मिळाले. ईकेवायसी करूनही लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळत नसल्याची ओरड गेल्या काही महिन्यांपासून महिलांची आहे.

Related posts

लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे पैसे कधी मिळणार? जाणून घ्या नवीन अपडेट

जनवृत्त

लाडकी बहीण योजनेत मोठा भ्रष्टाचार? धक्कादायक माहिती उघड

जनवृत्त

चार हजार लाडक्या बहिणींनी माघार घेतल्यानंतर मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, “सरकारी तिजोरी..

जनवृत्त

Leave a Comment