Warning: Constant RUBY_SUBMISSION_VERSION already defined in /home/u653352205/domains/janvrutt.in/public_html/wp-content/plugins/ruby-submission-5tzywG/ruby-submission.php on line 17

Warning: Constant RUBY_SUBMISSION_PATH already defined in /home/u653352205/domains/janvrutt.in/public_html/wp-content/plugins/ruby-submission-5tzywG/ruby-submission.php on line 18

Warning: Constant RUBY_SUBMISSION_URL already defined in /home/u653352205/domains/janvrutt.in/public_html/wp-content/plugins/ruby-submission-5tzywG/ruby-submission.php on line 19
श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर निशाणा | म्हणाले, आम्ही आमच्या कामात व्यस्त
Janvrutt.in
राजकारण

श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर निशाणा | म्हणाले, आम्ही आमच्या कामात व्यस्त

श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर निशाणा | म्हणाले, आम्ही आमच्या कामात व्यस्त

खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटलं की, विरोधकांना काही काम उरले नाही. एनडीए सरकार बहुमताने निवडून आले आहे. पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना पेन्शन योजना किंवा नोकरीत सामावून घेण्याची सूचना संरक्षणमंत्र्यांकडे केली.

नुकताच खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. श्रीकांत शिंदे हे म्हणाले की, विरोधकांना काही काम उरलं नाही. बहुमतांनी एनडीए सरकार निवडून आलंय. शिंदे साहेबांनी काम केलं त्या कामाकडे बघून ना भूतो ना भविष्य अशाप्रकारे आम्हाला बहुमताने लोकांनी विजयी केले. आता तरी देखील विरोधक पुन्हा टीका करत आहेत. पुढे बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, चांगलं काम करून ही टीका करतात, त्यामुळे त्यांच्याकडे जास्त लक्ष न देता आम्ही आमचं काम करत राहू विरोधकांना जे बोलायचं ते बोलत राहू दे.

पहलगाम हल्ल्यानंतर एकनाथ शिंदे हे जम्मू काश्मीरकडे रवाना झाले होते. पहलगाम हल्ल्याबद्दल बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, पहलगाममध्ये जी घटना घडली, त्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला. याबद्दल दिल्लीमध्ये संरक्षण मंत्री यांच्यासोबत जी मीटिंग होती, त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टीवरती चर्चा झाली. यावेळी मी या मिटिंमध्ये एक सल्ला दिला होता.

हल्ल्यात घरातील कर्ता पुरूष हा मरण पावतो, त्यावेळी त्या कुटुंबियांसाठी पेन्शन योजना सुरू करू शकतो का? किंवा त्यांना नोकरीमध्ये समाविष्ट करू शकतो का?, अशी देखील सूचना आम्ही संरक्षण मंत्र्यांकडे केली होती. सगळ्यांची जी भावना आहे ती भावना सरकारची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीरमध्ये ज्याप्रकारे हल्ले होत होते ते हल्ले आता कमी झालेले आहेत. 370 लागू झाल्यानंतर लोकांना नोकऱ्या, चांगले रस्ते त्या ठिकाणी मिळाले.

त्या ठिकाणी शांतता राबत होती. मात्र, काही संघटनेला आणि देशाला ते बघत नव्हते. त्यासाठी काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप करून आतंकवादी संघटनांना बळ देण्याचे काम करत आहे. इतका वर्षांनी पाकिस्तानवर कठोर कारवाई झाली. लोकांच्या भावना लक्षात घेऊन पाकिस्तानला त्यांच्या शब्दात जी भाषा कळते त्या भाषेत समजावणे हे गरजेचे आहे आणि हे नरेंद्र मोदी करणार, असे श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत.

Related posts

शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष

जनवृत्त

२९ महानगरपालिका निवडणुकीत विरोधक कोण? महायुती-मविआचे तीनतेरा

जनवृत्त

जरांगेंनी उपोषण सोडताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

जनवृत्त

Leave a Comment