या प्रसिद्ध अभिनेत्रीने अजून एक करिअरचा मार्ग निवडला. तिने भंगारातून कोट्यवधींची कमाई केली. तिच्या नवीन ब्युटी ब्रँडने सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोण आहे ती भारतीय अभिनेत्री?
या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये तिची वेगळी ओळख तयार केल्यानंतर तिने हॉलिवूडमध्ये पण बस्तान बसवले. करियरमध्ये तिने अजून एक मार्ग चोखंदळलाय. अवघ्या दोनच वर्षात तिने खास ब्युटी ब्रँड तयार केला. ती पूर्वीपासूनच स्मार्ट आणि बोल्ड विथ ब्युटीफूल म्हणून ओळखली जाते. तिच्या ब्रँडने सध्या जगात धुमाकूळ घातला आहे. प्रसिद्ध गायिका रिहानाच्या फेंटी ब्युटी ब्रँड 4200 कोटींचा आहे. त्याच्या लगेचच मागे आता या भारतीय गुणी अभिनेत्रीचा ब्रँड आहे.
गुणी अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने ॲनमोली हेअरकेअर (Anomaly Haircare) हा ब्युटी ब्रँड सुरु केला होता. 2023 मध्ये 429 दशलक्ष युरो म्हणजे जवळपास 3800 कोटी रुपयांची कमाई तिने या ब्रँडमधून केली. प्रियंकाने काईली जेनर आणि सेलेना गोमेज या सारख्या दिग्गजांना मागे टाकत यशाचे शिखर पदाक्रांत केले.
भंगारातून उभारला मोठा व्यवसाय
ॲनमोली हेअरकेअरमध्ये शॅम्पू,कंडीशनर,हेअर मास्क सारखी अनेक सौंदर्य उत्पादनं आहेत. पण या ब्रँडची खरी खासियत आहे ती त्याची विशेष पॅकेजिंग. प्रियंकाने तिच्या उत्पादनासाठीच्या बॉटल या 100 टक्के भंगारातील प्लॅस्टिकमधून तयार केल्या आहेत. जे प्लॅस्टिक कचऱ्यात फेकण्यात येते. त्यातून या बॉटल तयार करण्यात आल्या आहेत. अनेक ब्रँड या पॅकेजिंगवर कोट्यवधींचा खर्च करतात. पण प्रियंकाच्या आयडीयाच्या कल्पनेतून या ब्रँडचे कोट्यवधी रुपये वाचले आहेत. पॅकेजिंगवर कमी खर्च, पण उत्पादन मात्र अधिक दर्जेदार असे ब्रीदवाक्यचं तिनं या बॉटलवर गोंदलंय. पातळ बॉटल कमी प्लास्टिक असा संदेशही तिने त्यावर दिला आहे.
उत्पादनांना तुफान लोकप्रियता
प्रियकांची ही योजना बाजारात तुफान चालली. तिच्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुकच झाले नाही तर उत्पादनांवर ग्राहकांच्या उड्या पडल्या. पर्यावरण पूरक उत्पादन आणि त्याची निर्मितीविषयी लोकांच्या मनात घर करण्यात प्रियंका आणि तिचा ॲनमोली हेअरकेअर ब्रँड यशस्वी ठरला. या ब्रँडची तोंडोतोंडी भरपूर प्रसिद्धी झाली. तिला नाहक जाहिरातीवर पण जास्त खर्च करावा लागला नाही. सोशल मीडियाचा खुबीने वापर करत तिने हे प्रोडक्ट जगाच्या बाजारात पोहचवले.
प्रियंकाचे हा ब्रँड 2022 मध्ये भारतात सुरू झाला. नायकाच्या स्टोरवर तिची उत्पादनं मिळत होती. सुरुवातीला या ब्रँडने नारळाचे तेल आणि कोरपड यांचे मिळून तेल तयार केले आणि त्याची विक्री केली. हळूहळू इतर अनेक उत्पादनं बाजारात आणण्यात आली. दर्जेदार, पर्यावरणपूरक उत्पादनं हा तिचा उद्देश आहे.सध्या जगात रिहानाचा ब्रँड टॉपवर आहे. आता काही दिवसात प्रियंकाचा ॲनमोली हेअरकेअर ब्रँड तिला मागे टाकत आघाडीवर येण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.