ठाणे शहरात तसेच ठाणे जिल्ह्यात CCTV लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार वाहतूक विभागाकडून मा.पोलीस आयुक्त यांना मी प्रशांत खानविलकर महाराष्ट्र उपाध्यक्ष या नात्याने निवेदन दिले होते याच अनुषंगाने दिनांक २२/०८/२०२५ रोजी कमिशनर ऑफिस मध्ये भेट दिली,त्याचप्रमाणे पोलीस दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त मा.श्री.प्रदीप परशुराम कन्नलू साहेब याची भेट घेतली त्याशिवाय मा.कन्नलू साहेबांनी ठाणे मध्ये नवीन लागलेले सर्व CCTV चे लाईव्ह फुटेज दाखवले आणि पुढील कार्यप्रणालीवर चर्चा केली.
सहाय्यक पोलिस आयुक्त मा.श्री.प्रदीप परशुराम कन्नलू साहेबांचे आणि त्यांच्या टीमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार वाहतूक विभागाकडून पुष्पगुच्छ देऊन आभार मानले आणि पुढील त्यांच्या प्रत्येक कार्यात राष्ट्रवादीचा सहभाग अग्रभागी असेल याची ग्वाही सुद्धा दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार वाहतूक विभागाच्या वारंवार मागणी नंतर ठाणे जिल्ह्यातील जनतेचा विजय झाला आहे.CCTV लागल्यामुळे आता ठाणे मध्ये होणाऱ्या चोऱ्या,रस्त्यावर होणाऱ्या गुंडगिरी,अपघात,वाहतूक कोंडी यावर आळा लागेल आणि पुन्हा एकदा ठाणे शहरात सामान्य नागरिकांना अभिप्रेत असलेला आपला ठाणे जिल्हा दिसेल यात तीळ मात्र शंका नाही.