janvrutt.in
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
  • अजित पवार
  • सरपंच संतोष देशमुख
  • उपमुख्यमंत्री अजित पवार
  • हार्दिक पांड्या
  • अंजली दमानिया
  • Renewable Energy
  • Opinion
  • आदिती तटकरे
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • New Business Ideas India
janvrutt.injanvrutt.in
Font ResizerAa
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • देश
  • लाइफस्टाइल
  • महाराष्ट्र
  • शहर
  • मुंबई
Search
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
Have an existing account? Sign In
Follow US
©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India.
कल्याण

कल्याण पूर्वेत रेडी मिक्सर अपघातात ९ वाहने चिरडली, ३ जखमी

Last updated: March 9, 2025 6:46 am
By जनवृत्त
Share
2 Min Read
nine vehicles crushed in a collision between ready mixer vehicles in vijayanagar kalyan east
SHARE

कल्याण – कल्याण पूर्वेतील विजयनगर भागात पुना जोड रस्त्यावर शनिवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या दरम्यान तयार सिमेंटचा गिलावा वाहून दोन रेडी मिक्सर वाहनांनी नऊ वाहनांना धडक देऊन चिरडले. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती गंभीर आहे.

कल्याण पूर्वेतील विजयनगर हा वर्दळीचा भाग. अपघात होत असताना या रस्त्यावर गर्दी कमी होती. अन्यथा मोठी जीवित हानी झाली असती, असे या भागातील व्यापाऱ्यांनी आणि प्रत्यदर्शींनी सांगितले. प्रत्यक्षदर्शींनी या अपघाताबद्दल दिलेली माहिती अशी, की विजयनगरमधील पालिकेच्या ड प्रभाग कार्यालयासमोरून दोन रेडी मिक्सर वाहने पाठोपाठ उतारावरून चक्कीनाका भागात जात होती. उतारावर असताना एक रेडी मिक्सर वाहनाचा ब्रेक निकामी झाला. मागील रेडी मिक्सर वाहन चालकाला समोरील रेडी मिक्सर वाहनाचा ब्रेक निकामी झाल्याचे समजताच, त्या वाहनाच्या चालकाने पुढील वाहनाला रोखण्यासाठी आपले वाहने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. या गडबडीत ब्रेक निकामी झालेला रेडी मिक्सर समोरील टेम्पोला जोरदार धडकला. त्यामुळे टेम्पो बाजुच्या झाडाला आणि दुकानांच्या समोरील भागाला धडकला.

टेम्पोला धडक बसल्याने टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि टेम्पोची धडक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकी, रिक्षांना बसली. बेसावध टेम्पो चालक झाड आणि दुकानांना धडकल्याने टेम्पोमधील व्यक्ति चालकाच्या केबीनमध्ये चेमकला गेला. त्याला बाहेर काढण्यासाठी नागरिक, पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांना केबीनमधून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. ब्रेक निकामी झालेल्या रेडी मिक्सरला वाचविण्यासाठी पुढे आलेला रेडी मिक्सर रस्ता दुभाजकाला धडकला. या विचित्र अपघातामुळे विजयनगर भागातील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली.

हा अपघात पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली होती. त्यामुळे वाहन कोंडीत आणखी भर पडली. वाहतूक पोलिसांनी तातडीने हालचाली करून क्रेन बोलावून अपघातग्रस्त वाहने मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरून बाजुला केली. रेडी मिक्सरच्या वाहनाच्या धडकेत चिरडलेली वाहने रस्त्यावरून क्रेनच्या साहाय्याने बाजुला घेऊन रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. ही वाहने बाजुला घेत असताना पु्न्हा या भागात कोंडी झाली होती. कोळसेवाडी पोलिसांनी या अपघात प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. दोन्ही रेडी मिक्सर वाहन मालकांच्या चौकशीतून अपघात कोणत्या कारणामुळे झाला हे पुढे येईल. त्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही जाईल, असे पोलिसांनी सांगितले. नुकसान झालेल्या वाहन चालकांनीही आपल्या वाहनाच्या भरपाईसाठी हालचाली सुरू केल्या होत्या.

TAGGED:vijayanagar kalyan eastकल्याण अपघातकल्याण पूर्वेत रेडी मिक्सर अपघातातकल्याण बातम्याट्रक अपघातठाणे अपघातताज्या बातम्यामहामार्ग अपघातमहाराष्ट्र वाहतूक बातम्यारेडी मिक्सर अपघातवाहतूक अपघातविजयनगर अपघात
Share This Article
Email Copy Link Print
Previous Article खरंच हार्दिक पांड्या बोल्ड अन् ब्युटीफल जस्मिन वलियाला डेट करत आहे का? खरंच हार्दिक पांड्या बोल्ड अन् ब्युटीफल जस्मिन वलियाला डेट करत आहे का? 
Next Article कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये किती पाकिस्तानी राहतात?
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • हेरा फेरी 3’मधून बाहेर पडल्यानावर अखेर परेश रावल यांनी उघड केली खरी कारणं
  • तुरुंगात वाल्मिक कराडची बडदास्त; फरसाण पासून चिकन पर्यंत!
  • वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; जप्तीची धडाकेबाज कारवाई
  • प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; ‘हा’ पक्ष युतीतून बाहेर
  • ज्योती मल्होत्रा प्रकरण: या 5 गोष्टींमुळे पोलिसांना संशय

Recent Comments

No comments to show.
janvrutt.in

आम्ही जनवृत्त मध्ये विश्वास ठेवतो की माहिती ही केवळ माहिती नाही, ती प्रेरणा आहे, ती संवाद आहे, ती शक्ती आहे जी समुदायाला जोडते आणि सशक्त करते. आमचे ध्येय स्पष्ट आहे – तुम्हाला अचूक, वेगवान आणि निष्पक्ष बातम्या देण्याचे. आम्ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे, अद्वितीय वारशाचे आणि अदम्य आत्म्याचे कौतुक साजरे करतो.

Facebook Instagram Youtube Twitter Rss

About Company

  • Contact Us
  • About us
  • Advertise With Us
  • Privacy Policy

Our Extended Network

  • TheIndiaBizz.com
  • TheSocialTrunk.in
  • Fitheal.in
  • HerView.in
  • EVInsights.online
  • PrimeProp.in
  • CookingMagic.in

©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India

Welcome to Janvrutt
Username or Email Address
Password

Lost your password?