janvrutt.in
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
  • अजित पवार
  • सरपंच संतोष देशमुख
  • उपमुख्यमंत्री अजित पवार
  • हार्दिक पांड्या
  • अंजली दमानिया
  • Renewable Energy
  • Opinion
  • आदिती तटकरे
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • New Business Ideas India
janvrutt.injanvrutt.in
Font ResizerAa
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • देश
  • लाइफस्टाइल
  • महाराष्ट्र
  • शहर
  • मुंबई
Search
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
Have an existing account? Sign In
Follow US
©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India.
क्रीडा

“संघर्ष करणाऱ्या कांबळीसाठी आजचा दिवस खास: बर्थ डे दिवशी अनोख्या कामाची शांतिकरी कामगिरी”

Last updated: January 18, 2025 7:35 am
By जनवृत्त
Share
3 Min Read
SHARE

विनोद कांबळी आज 18 जानेवारीला 53 वर्षांचा झाला. सध्या विनोद कांबळीचा संघर्ष सुरु आहे. विनोद कांबळीची आजची स्थिती पाहून अनेकजण हळहळ व्यक्त करतायत. विनोदच्या करिअरची सुरुवात जितकी दमदार झाली, शेवट तितकाच वाईट झाला. विनोदने त्याच्या बर्थ डे च्या दिवशीच कधीही न विसरता येण्यासारख एक काम केलं होतं.

विनोद कांबळीसाठी आजचा दिवस खूप खास आहे. कारण आजच्याच दिवशी त्याचा जन्म झाला होता. 1972 चा जन्म असलेला विनोद कांबळी आज 53 वर्षांचा झाला आहे. विनोद कांबळीसाठी ही तारीख काही दुसऱ्या कारणांमुळे सुद्धा खास आहे. 18 जानेवारीलाच विनोद कांबळीने अशी काही कमाल केली होती की, तो कधी विसरणार नाही. विनोद कांबळीने 18 जानेवारीलाच वाढदिवशी करिअरमधील पहिलं शतक झळकावलं होतं. त्यावर्षी कांबळीचा 21 वा वाढदिवस होता. जयपूरमध्ये इंग्लंड विरुद्ध तो शतकीय इनिंग खेळला होता.

18 जानेवारी 1993 रोजी विनोद कांबळी ही धमाकेदार इनिंग खेळला होता. आपल्या वाढदिवशी विनोद कांबळी तिसऱ्या नंबरवर फलंदाजीसाठी उतरला होता. टीम इंडियाची खराब सुरुवात झाली. नवज्योतसिंह सिद्धू दुसऱ्याच चेंडूवर आऊट झाला. त्यानंतर कांबळीने विकेटवर येऊन टीम इंडियाचा डाव सावरला. जयपूरची विकेट फलंदाजीसाठी कठीण होती. म्हणून कांबळीने क्रीजवर पाय रोवून फलंदाजी केली.

सचिनने त्या मॅचमध्ये किती धावा केलेल्या?

त्याने बालमित्र सचिन तेंडुलकरसोबत मिळून टीम इंडियाची धावसंख्या 223 पर्यंत पोहोचवली. कांबळीने 202 मिनिट फलंदाजी केली. त्याने 149 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. त्याने 9 चौकार आणि एक षटकार लगावला. सचिनने 81 चेंडूत 82 धावा केल्या. त्याने सहा फोर आणि एक सिक्स मारला. भारताचा या सामन्यात पराभव झाला होता. इंग्लंडने चार विकेट राखून 223 धावांच लक्ष्य पार केलं होतं.

शेवट तितकाच वाईट

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ जाहीर! उपकर्णधारपदी ‘या’ युवा खेळाडूची लागली वर्णी
मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित
टीम इंडियाला सामन्यासह मालिका विजयाची संधी, इंग्लंडसाठी ‘करो या मरो’, कोण जिंकणार?

विनोद कांबळीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटची धमाकेदार सुरुवात केली होती. सचिनने कांबळीच्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली. पण सचिनच्या दीड वर्ष आधी कांबळीने आपलं पहिलं वनडे शतक झळकावलं होतं. कांबळीने आपल्या पहिल्या चार कसोटी सामन्यातच दोन द्विशतकं झळकावली होती. त्याने पुढच्या दोन टेस्ट मॅचमध्ये सुद्धा आणखी दोन शतकं झळकावली. कांबळीने जितकी दमदार त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात केली होती, शेवट तितकाच वाईट झाला. कांबळीने टीम इंडियाकडून खेळताना 17 टेस्ट मॅचमध्ये 54.20 च्या सरासरीने 1084 धावा केल्या. कांबळी 104 वनडे सामने खेळला. त्यात त्याने 32.59 च्या सरासरीने 2477 धावा केल्या.

TAGGED:vinod kambli birthdayvinod kambli castVinod Kambli News
Share This Article
Email Copy Link Print
Previous Article सैफ नव्हे, दुसराच होता टार्गेट? जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट सैफ नव्हे, दुसराच होता टार्गेट? जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट
Next Article देवमाणूस फेम किरण गायकवाडने लग्नानंतर बायकोचा पहिला वाढदिवस 'अशा' पद्धतीने साजरा केला देवमाणूस फेम किरण गायकवाडने लग्नानंतर बायकोचा पहिला वाढदिवस ‘अशा’ पद्धतीने साजरा केला
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • हेरा फेरी 3’मधून बाहेर पडल्यानावर अखेर परेश रावल यांनी उघड केली खरी कारणं
  • तुरुंगात वाल्मिक कराडची बडदास्त; फरसाण पासून चिकन पर्यंत!
  • वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; जप्तीची धडाकेबाज कारवाई
  • प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; ‘हा’ पक्ष युतीतून बाहेर
  • ज्योती मल्होत्रा प्रकरण: या 5 गोष्टींमुळे पोलिसांना संशय

Recent Comments

No comments to show.
janvrutt.in

आम्ही जनवृत्त मध्ये विश्वास ठेवतो की माहिती ही केवळ माहिती नाही, ती प्रेरणा आहे, ती संवाद आहे, ती शक्ती आहे जी समुदायाला जोडते आणि सशक्त करते. आमचे ध्येय स्पष्ट आहे – तुम्हाला अचूक, वेगवान आणि निष्पक्ष बातम्या देण्याचे. आम्ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे, अद्वितीय वारशाचे आणि अदम्य आत्म्याचे कौतुक साजरे करतो.

Facebook Instagram Youtube Twitter Rss

About Company

  • Contact Us
  • About us
  • Advertise With Us
  • Privacy Policy

Our Extended Network

  • TheIndiaBizz.com
  • TheSocialTrunk.in
  • Fitheal.in
  • HerView.in
  • EVInsights.online
  • PrimeProp.in
  • CookingMagic.in

©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India

Welcome to Janvrutt
Username or Email Address
Password

Lost your password?