मराठा-कुणबी एकच या जीआरशिवाय मुंबई सोडणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलं. त्यांच्या आमरण उपोषण आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. न्यायदेवता आमच्या बाजूने न्याय देईल. आता मुंबईत कुठेही ट्रॅफिक नाही. कोर्टाचे आदेश येताच आम्ही वाहनं हटवली” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“आम्ही शांत आहोत, देवेंद्र फडणवीस आम्हाला शांत राहू द्या. शनिवार-रविवारी मराठे जर मुंबईत आले तर सोमवारच आंदोलन खूप छान असेल. ही वेळ मराठ्यावर येऊ देऊ नका. आम्ही मुंबई सोडणार नाही यावर ठाम आहे. शंभर पोलीस आले किंवा लाख पोलीस आले, तरी जेलमध्येच नेणार. तुम्ही एखाद्या समाजावर अन्याय होईल असं वागू नका. हैदराबाद गॅझेटशिवाय मुंबई सोडणार नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“तुम्हाला वाटत असेल, तुमच्यापेक्षा आमची संख्या जवळपास साडेनऊपट जास्त आहे. जिकडे नाही घुसायच तिकडे घुसू नका. उगाच आझाद मैदानातून हटवण्याच्या वल्गना करु नका. गोरगरीब मराठ्यांना न्याय द्या. मेलो तरी आझाद मैदानातून हटत नाही. त्याचे दुष्परिणाम तुम्ही आणि मराठे जाणतो. मागण्याची अंमलबजावणी घेतल्याशिवाय जाणार नाही. मराठे काय असतात हे 350 वर्षानंतर बघायच असेल तर माझा नाईलाज आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“रात्री तुम्ही सांगितलं गाडी रस्त्यात ठेऊ नका घेऊन गेलो. सीएसटी बीएमसी रिकामी करा, केली. कोणत्या नियमांचं उल्लंघन केलं? देवेंद्र फडणवीस यांनी अन्यायकारक आमच्याशी वागू नये. न्यायदेवता आमच्याशी अन्यायकारक वागत नाही. देवेंद्र फडणवीस उलटं-सुटल करतो. न्याय देवतेला खोटी माहिती देतो. देवेंद्र फडणवीस कुटील डाव खेळायला लागला. मराठ्यावर अन्याय करतो, याचा दुष्परिणाम देवेंद्र फडणवीसाला भोगावे लागतील” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“आमची सरकारसोबत पहिल्यादिवसापासून चर्चेची तयारी आहे. हैदराबाद गॅझेट पाहिजेच पण सातारा संस्थानच सुद्धा पाहिजेच. 30-35 मंत्री या किंवा दोघे या आम्ही चर्चेला तयार आहोत. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी मागितलेल्या चार गॅझेटपैकी दोन गॅझेटचा अभ्यास बाकी आहे. हैदराबादचा गॅझेट, सातारा संस्थानच्या गॅझेटची अमलबजावणी करायला हरकत काय आहे? चंद्र-सूर्य असेपर्यंत माझ्या जातीला टिकेल असं मी घेतो” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.