Janvrutt.in
कल्याण-डोंबिवली

महापालिकेतील वरिष्ठ लिपिकावर महिला कर्मचाऱ्याला छळ केल्याचा आरोप

municipal-clerk-harassment-case-demand-for-sexual-favor

राज्यभरात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. यावेळी लिपिकाने एका महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.

राज्यभरात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अलीकडेच कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. वरिष्ठ लिपिकाने एका महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. या मागणीचं कारणही आरोपीने सांगितलं असून कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरेक्षेचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे.

केडीएमसीतील या प्रकरणात सेटलमेंटसाठी वरिष्ठ लिपिकाने शरीरसुखाची मागणी केली असल्याचं समोर आलं आहे. महिलेने धाडस दाखवून पोलिसांत तक्रार केल्यानंतर ही घटना उघड झाली.  हा घाणेरडा प्रकार डोंबिवलीतील सावळाराम संकूलातील असून संबंधित लिपिकाला निलंबीत करण्यात आले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पालिकेकडून ही कारवाई करण्यात आली. असे प्रकरण रोखण्यासाठी कठोर कारवाई करणं आता आवश्यक झालं आहे.

Related posts

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक निकाल 2026: वॉर्डनिहाय व पक्षनिहाय विजेते यादी

जनवृत्त

हर्षाली थविल-चौधरी कल्याण-डोंबिवलीच्या नव्या महापौर; राहुल दामले उपमहापौर

जनवृत्त

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक , महायुतीच्या फॉर्म्युल्याला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध

जनवृत्त

Leave a Comment