Janvrutt.in
मुंबईराजकारण

ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रशांत अशोकराव खानविलकर यांचा जाहीर प्रवेश


ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज प्रशांत अशोकराव खानविलकर यांचा अधिकृत व जाहीर पक्षप्रवेश पार पडला. हा पक्षप्रवेश ठाणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. खासदार श्री. सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व प्रदेश प्रवक्ते मा. श्री. आनंद परांजपे, ठाणे जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा. श्री. नजीब मुल्ला तसेच महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा. श्री. सुहास देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा जाहीर पक्षप्रवेश संपन्न झाला.
या वेळी प्रशांत अशोकराव खानविलकर यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त केला.
पक्षप्रवेशानंतर बोलताना प्रशांत अशोकराव खानविलकर यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुरोगामी विचारधारेनुसार प्रामाणिकपणे कार्य करत सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आणि सामाजिक विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
या पक्षप्रवेशामुळे ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक वाढेल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Related posts

एमआयएमला राज्यात मोठा धक्का , पक्षाच्या टॉप नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

जनवृत्त

नितीन गडकरी यांना 2025 चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

जनवृत्त

वंचितने काँग्रेसकडे 63 जागांची मागणी; 16 जागांवर अर्जच नाहीत, कारण काय?

जनवृत्त

Leave a Comment