महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाप्रसंगी राज्याच्या पायाभूत सुविधांमधील महत्त्वपूर्ण प्रगतीवर प्रकाश टाकला. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या १० वर्षांत अनेक प्रलंबित प्रकल्प मार्गी लावले. नवी मुंबई विमानतळ हे ९० च्या दशकापासून केवळ कागदावर होते, परंतु मोदींच्या प्रगती बैठकीमुळे ते प्रत्यक्षात आले.
अनेक अडथळे पार करत, पहाड तोडून आणि नदीचा प्रवाह वळवून हे इंजिनिअरिंग मार्वल साकारले गेले आहे. यासोबतच, देशातील सर्वात मोठी ४० किलोमीटर लांबीची भुयारी मेट्रो, ग्रीन ट्रिब्युनल आणि न्यायालयांच्या अडथळ्यांवर मात करत पूर्ण झाली. जपान सरकार आणि JICA च्या मदतीबद्दलही फडणवीस यांनी आभार मानले.
मुंबई वन या ॲपचे उद्घाटनही करण्यात आले, जे मेट्रो, मोनो, बस, वॉटर टॅक्सी आणि उपनगरीय रेल्वेसाठी एकीकृत तिकीट सुविधा देईल. महाराष्ट्राच्या तरुणांसाठी कौशल्य विकासाचे स्टेप योजना सुरू करण्यात आली आहे. हे सर्व प्रकल्प महाराष्ट्राला प्रगतीच्या नव्या वाटेवर घेऊन जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तर नवी मुंबई एअरपोर्ट जवळ तिसरी आणि वाढवण जवळ चौथी मुंबई होणार आहे. मोदीजी तुम्ही महाराष्ट्राच्या पाठी पहाडासारखे उभे राहता. त्यामुळे महाराष्ट्र पुढे जात आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, असेही त्यांनी म्हटले.