Janvrutt.in
राजकारण

पालकमंत्रिपदाची यादी जाहीर; कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाकडे? बीडचे पालकमंत्री कोण? वाचा यादी

पालकमंत्रिपदाची यादी जाहीर; कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाकडे? बीडचे पालकमंत्री कोण? वाचा यादी

Maharashtra Guardian Minister List : महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर अखेर आज (१८ जानेवारी) पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहरचं पालकमंत्रिपद असणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्हा आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे.

मंत्री धनंजय मुंडेंना धक्का

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर बीड जिल्ह्यात चांगलंच राजकारण तापलं होतं. यावरून धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद देण्यास बीड जिल्ह्यातील आमदारांनी विरोध केला होता. त्यानंतर आता बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं आहे. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांना या पालकमंत्रिपदाच्या यादीतून वगळण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांना कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलेलं नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.

रायगडच्या पालकमंत्रिपदी आदिती तटकरे

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटात मोठी रस्सीखेच सुरु होती. भरत गोगावले यांनी रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळावं, यासाठी आग्रही होते. याबाबत त्यांनी अनेकदा अपेक्षाही बोलून दाखवल्या होत्या. मात्र, रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आली आहे.

कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद कोणाकडे? वाचा यादी

क्र.जिल्हापालकमंत्रिपद
गडचिरोलीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सह.आशिष जयस्वाल
ठाणे, मुंबई शहरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे, बीडउपमुख्यमंत्री अजित पवार
नागपूर, अमरावतीचंद्रशेखर बावनकुळे
अहिल्यानगरराधाकृष्ण विखे पाटील
नाशिकगिरीश महाजन
वाशिमहसन मुश्रीफ
सांगलीचंद्रकांत पाटील
जळगावगुलाबराव पाटील
१०यवतमाळसंजय राठोड
११मुंबई उपनगरआशिष शेलार व सह.मंगलप्रभात लोढा
१२रत्नागिरीउदय सामंत
१३धुळेजयकुमार रावल
१४जालनापंकजा मुंडे
१५नांदेडअतुल सावे
१६चंद्रपूरअशोक ऊईके
१७साताराशंभुराजे देसाई
१८रायगडअदिती तटकरे
१९सिंधुदुर्गनितेश राणे
२०लातूरशिवेंद्रसिंहराजे भोसले
२१नंदुरबारमाणिकराव कोकाटे
२२सोलापूरजयकुमार गोरे
२३हिंगोलीनरहरी झिरवाळ
२४भंडारासंजय सावकारे
२५छत्रपती संभाजीनगरसंजय शिरसाट
२६धाराशीवप्रताप सरनाईक
२७बुलढाणामकरंद जाधव
२८अकोलाआकाश फुंडकर
२९गोंदियाबाबासाहेब पाटील
३०कोल्हापूरप्रकाश आबिटकर, सह, माधुरी मिसाळ
३१वर्धापंकज भोयर
३२परभणीमेघना बोर्डीकर
३३पालघरगणेश नाईक

Related posts

मनसेच्या उमेदवारांचं निवडणुकीपूर्वीच अपहरण?

जनवृत्त

श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर निशाणा | म्हणाले, आम्ही आमच्या कामात व्यस्त

जनवृत्त

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार वाहतूक विभागाच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री.प्रशांत खानविलकर यांच्या CCTV च्या मागणीला यश

जनवृत्त

Leave a Comment