Janvrutt.in

Category : मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाचं नेतृत्व करतात. मनोज जरांगे हे बीडचे रहिवासी आहेत. पण लग्नानंतर जालन्यातील शहागड ही त्यांनी आपली कर्मभूमी केली. गेल्या 15 वर्षापासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आंदोलनात सक्रिय आहेत. त्यांनी अनेक आंदोलनात भाग घेतला आहे. सतत आंदोलनात भाग घेत असल्याने घरातील आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी चार एकर जमिनीपैकी अडीच एकर जमीन विकली होती. सुरुवातीला जरांगे हे काँग्रेसमध्ये काम करायचे. पण नंतर त्यांनी शिवबा संघटना स्थापन करून आरक्षण आंदोलन सुरू केलं. कुटुंबापासून दूर राहून मनोज जरांगे पाटील गेल्या दोन वर्षापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन लाखा लाखाच्या सभा घेऊन मराठा समाजाला जागृत करत आहेत. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे. मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवली सराटीतून मराठा आरक्षणासाठी उपोषणं सुरू केली होती. त्यांनी अनेकवेळा उपोषण केलं. त्याचा परिणाम म्हणून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा आणि त्याचं वाटप सुरू करण्याचं काम सरकारने केलं. तसेच सगेसोयऱ्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून मनोज जरांगे पाठपुरावा करत आहेत. काही प्रमाणात त्याला यशही आलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचं फलित म्हणून सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत.

मनोज जरांगे पाटीलराजकारण

जरांगेंनी उपोषण सोडताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

जनवृत्त
मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले याचा मला आनंद आहे. मंत्रिमंडळ उपसमितीने आज मराठा समाजाच्या हितासाठी चांगला तोडगा काढला याचाही मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र...
मनोज जरांगे पाटीलराजकारण

जरांगे पाटील मुंबई सोडणार नाहीत? GR शिवाय पत्रकार परिषदेत 5 महत्त्वाचे मुद्दे

जनवृत्त
मराठा-कुणबी एकच या जीआरशिवाय मुंबई सोडणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलं. त्यांच्या आमरण उपोषण आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. न्यायदेवता आमच्या बाजूने...
मनोज जरांगे पाटीलराजकारण

आम्ही मराठ्याची औलाद: शनिवार-रविवारी वादळाचा इशारा, सोमवारी मोठा निर्णय?

जनवृत्त
आम्ही मराठ्याची औलाद असा इशारा देत मराठे मुंबईत येणार आणि त्यांना कोणी अडवू शकत नाही असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. त्यातच शनिवार-रविवारी...