Janvrutt.in

Category : शरद पवार

शरद पवार हे भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे नेते आहेत. पवार हे महाराष्ट्राचे चारवेळा मुख्यमंत्री होते. केंद्रातील पी.व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री म्हणून आणि मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर 1999 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. सध्या ते राज्यसभेचे सदस्य आहेत. तसेच राज्यातील महाविकास आघाडीचे ते शिल्पकारही आहेत. महाराष्ट्रातील प्रभावशाली राजकीय कुटुंब असलेल्या पवार कुटुंबातील आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील ते एक प्रमुख चेहरा आहेत. कुटुंबातील इतर राजकारण्यांमध्ये त्यांची मुलगी सुप्रिया सुळे, पुतण्या अजित पवार आणि नातू रोहित पवार हे राजकारणात सक्रिय आहेत. शरद पवार यांनी 2005 ते 2008 पर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. 2010 ते 2012 पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले. ऑक्टोबर 2013 ते जानेवारी 2017 या कालावधीत ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. कुस्ती या खेळालाही मानाचं स्थान निर्माण करून देण्यात शरद पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. भारत सरकारने त्यांना 2017 मध्ये पद्मविभूषण हा भारताचा दुसरा-सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला आहे.

राजकारणशरद पवार

अखेर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा निर्णय , मुंबई महापालिकेसाठी ठाकरे गटासोबत युती

जनवृत्त
...
अजित पवारराजकारणशरद पवार

पवार काका-पुतण्याची चाल; मविआमध्ये खळबळ, पुण्यात नेमकं काय घडलं?

जनवृत्त
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पडद्यामागे प्रचंड राजकीय घडामोडी सुरु आहेत. पुणे महापालिका निवडणुकीत कुणाची युती आणि कुणाची आघाडी होईल? याकडे सर्वांचं लक्ष आहे....
राजकारणशरद पवार

पुढच्या 48 तासांत राजकीय भूकंप? काँग्रेसचा शरद पवारांच्या पक्षाला थेट अल्टिमेटम

जनवृत्त
ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. युती आणि आघाडी करताना जास्तीत जास्त जागा आपल्याच वाट्याला कशा येतील, यासाठी प्रत्येक पक्षाची धडपड...
अजित पवारराजकारणशरद पवार

राजकारणात भूकंप! अजित पवार–शरद पवार एकत्र येणार? घोषणेची तारीख ठरली

जनवृत्त
सध्या राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीव राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सर्वच प्रमुख पक्ष राज्यात जोमात प्रचार करत आहेत. दुसरीकडे विजयाचे शिखर गाठण्यासाठी सध्या युती आणि...