Janvrutt.in
महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यात ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ सुरू

रायगड जिल्ह्यात ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ सुरू

 भ्रष्टाचाराविरुद्ध अँटी करप्शन ब्युरोची मोहीम!

“लाच देणे व घेणे हा कायद्याने गुन्हा” – एसीबीचा जनतेला इशारा : तुम्हीही भ्रष्टाचार रोखू शकता!

रायगड / नरेश जाधव :- रायगड जिल्ह्यात अँटी करप्शन ब्युरो (Anti-Corruption Bureau – ACB) तर्फे ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ (Vigilance Awareness Week) 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 दरम्यान उत्साहात साजरा केला जात आहे. या अभियानाचा मुख्य संदेश “दक्षता आपली सामाजिक जबाबदारी” (Vigilance: Our Shared Responsibility) आहे. या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना भ्रष्टाचारविरोधी लढ्यात सहभागी होऊन सजग आणि जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

* भ्रष्टाचार थांबवा – तुम्हीही पुढाकार घ्या :- अँटी करप्शन ब्युरोने दिलेला स्पष्ट संदेश असा आहे की, कोणताही सरकारी अधिकारी, कर्मचारी किंवा लोकसेवक जर लाच (पैसे, वस्तू वा सुविधा) मागत असेल, तर तुम्ही आम्हाला तात्काळ कळवा, आम्ही त्याला रंगेहात पकडू. एसीबीने जनतेला लक्षात आणून दिले आहे की, लाच देणे आणि घेणे – दोन्हीही कायद्याने गुन्हा आहे. प्रत्येक तक्रारीवर गोपनीयता राखून तातडीने कारवाई केली जाईल.

अँटी करप्शन ब्युरो रायगड, रायगड सदन, पिंपळभाट एस.टी. बस स्टॉपजवळ, अलिबाग, जिल्हा रायगड

📞 संपर्क क्रमांक :  02141-222331

टोल फ्री क्रमांक : 1064

📧 ईमेल : dyspacbraigad@gmail.com

अधिकारी संपर्क :- सरिता भोसले, पोलिस उपअधीक्षक (90043 74910), निशांत धनवडे, पोलिस निरीक्षक (81083 55488), नारायण सरोदे — पोलिस निरीक्षक (79771 16231).

अधिकाऱ्यांचा जनतेस संदेश :- जर कोणी लाच मागत असेल, तर घाबरू नका…अँटी करप्शन ब्युरोशी संपर्क साधा, तुमची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल. या मोहिमेचा उद्देश फक्त भ्रष्टाचारविरोधी कारवाई करणे नाही, तर नागरिकांमध्ये नैतिकता, पारदर्शकता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा आहे. लाच देणे म्हणजे भ्रष्टाचाराला खतपाणी घालणे. एसीबीने जनतेला आवाहन केले आहे की, स्वतः लाच देऊन काम करवून घेण्याची सवय थांबवली, तर भ्रष्टाचाराचे जाळे आपोआप कोसळेल. शासनाच्या योजना सर्वांना न्यायाने मिळाव्यात, यासाठी दक्षता आवश्यक आहे. लाच देणे व घेणे हा कायद्याने गुन्हा…नागरिकांनी धैर्याने पुढे येऊन भ्रष्टाचारविरोधी लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन एसीबीने केले आहे.

Related posts

बारावी निकाल 2025: 91.88% विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण विभाग अव्वल

जनवृत्त

काँग्रेसची मोठी घोषणा, नव्या युतीमुळे राजकीय समीकरणांत उलथापालथ

जनवृत्त

हिरव्या सापांना दूध पाजू नका, ते…’ मंत्री नितेश राणे यांचं वादग्रस्त विधान, नेमकं काय म्हणाले?

जनवृत्त

Leave a Comment